top of page

विनामास्क बँकेत जाणं पडलं महागात; सुरक्षारक्षकानं झाडली गोळी

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात मास्क न घातल्याने बँक ऑफ बडौदाच्या सुरक्षारक्षकाने एका व्यक्तीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. या दुर्घटनेत राजेश कुमार (रा. रेल्वे कॉलनी, बरेली ) हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरक्षारक्षक केशव प्रसाद याला अटक केली आहे.

ree

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील जंक्शनजवळ रेल्वे कॉलनीत राहणारे राजेश कुमार शुक्रवारी सकाळी ११ वाजता राजेश स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडौदाच्या शाखेत पासबुक अपडेट करण्यासाठी गेला होते. तेव्हा राजेश यांनी मास्क न घातल्याने सुरक्षारक्षकाने त्यांना रोखलं आणि बँकेत जाण्यास मनाई केली. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादात सुरक्षारक्षकाने थेट बंदूक काढत राजेश यांच्या पायावर गोळी मारली. त्यानंतर बँकेत एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमी राजेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोळी पायाला लागल्याने राजेश यांच्या पायाचं हाड तुटलं असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकरणानंतर बँकेनं घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचं सांगत जखमी राजेश यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.


 
 
 

Comments


bottom of page