top of page

पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला यांचा ‘टाइम’च्या प्रभावशाली व्यक्तींची यादीत समावेश

"टाइम"मॅगझीनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या शंभर जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांचा समावेश करण्यात आला आहे. बुधवारी "टाइम"मॅगझीनने १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली असून त्यात अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, प्रिन्स हॅरी, डोनाल्ड ट्रम्प, तसेच तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.

ree

टाइमच्या यादीत टेनिसपटू नाओमी ओसाका, रशियातील विरोधी नेते अलेक्झी नवाल्नी, संगीतकार ब्रिटनी स्पिअर्स, आशियन पॅसिफिक पॉलिसी अ‍ॅण्ड प्लानिंग कौन्सिलच्या कार्यकारी संचालक मंजुषा पी. कुलकर्णी, अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक, जागतिक व्यापार संघटनेचे नेतृत्व करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला नगोझी ओकोन्झो इवियला यांचाही समावेश आहे.



 
 
 

Comments


bottom of page