top of page

... पण केवळ मोदींच्या नावे आम्हाला मतं मिळतील याची काही शाश्वती नाही; केंद्रीय नेत्याचं मोठं वक्तव्य

नरेंद्र मोदींचे आशीर्वाद आमच्यावर आहेत. आमच्या राज्यावर ... पण केवळ त्यांच्या एकटयाच्या नावामुळेच आम्हाला मतं मिळतील याची काही शाश्वती नाही. मतदार मोदींच्या नावे मतं देतील असा आपला हेतू असू शकतो, पण हे सर्व तळागळात काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी केलं आहे. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते. आणि हा व्हिडीओ समोर आला आहे.

ree

या व्हिडिओत त्यांनी २०१४ मधील भाजपाच्या मोठ्या विजयाचा उल्लेख करताना म्हटलं की, “केंद्रात मोदींमुळेच भाजपा सत्ता स्थापन करु शकली हे आम्हाला मान्य आहे. त्याचा राज्यांवर मोठा परिणाम झाला ... अगदी हरियाणामध्ये जेथे पहिल्यांदाच भाजपाने आपलं सरकार स्थापन केलं. आणि ते दुसऱ्यांदाही घडले ... पण सहसा असे होते की दुसऱ्या पक्षाला संधी मिळते "

पहिल्यावेळी भाजपाला ९० पैकी ४७ जागा मिळाल्या, तर दुसऱ्यावेळी ४० जागा मिळाल्या असं सांगताना विजयी आकडेवारी कमी होत असते असं त्यांनी सांगितलं. पण त्या ४५ जागांवर टिकून राहू शकू की नाही याचा विचार करायला हवा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आणि बैठकीला उपस्थित असलेल्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page