top of page

VIDEO : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला!; सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यादरम्यान ते काही मूर्तीला हार घालणार होते. तेव्हा एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तरीही तरुणाने धाडस करत मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. त्यानंतर उपस्थित पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या घटनेचा व्हिडिओही देखील समोर आला आहे. ज्यामध्ये तो तरुण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागोमाग मंचावर चढतो आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला चढवताना दिसत आहे. त्यानंतर संरक्षणात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तरुणाला पकडले व स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.


 
 
 

Comments


bottom of page