top of page

‘त्या’ निर्णयाचा नितेश राणेंना फटका; जामीन अर्जावर उद्या सुनावणी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. मात्र भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. याचा फटका नितेश राणेंच्या या सुनावणीला बसला आहे.

ree

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज म्हणजेच सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झाल्याने राज्य सरकारने दुखवटा जाहीर करत सुट्टीची घोषणा केलीय. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झालेत. आजची सुनावणी लांबल्याने त्यांचा मुक्काम वाढलाय.



 
 
 

Comments


bottom of page