top of page

नीरज चोप्राने मोडला स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम; पाहा Video

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ८९.३० मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केलाय. यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होते. फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स २०२२ मध्ये नीरजने या नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये ८८.०७ मीटर दूर भाला फेकला होता. ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं होतं.

टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून त्याने यामध्ये रौप्य पदकाची कमाई केलीय. या स्पर्धेमध्ये फिनलॅण्डच्या ऑलिव्हर हीलॅण्डरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने ८९.८३ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.



 
 
 

Comments


bottom of page