top of page

धक्कादायक : फळ विक्रेत्याने डॉक्टर बनून केले कोविड रुग्णांवर उपचार

फळ विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःला डॉक्टर असल्याचं दाखवत रुग्णालय सुरू केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंदन नरेश चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो नागपूरमधील कामठी भागातील रहिवाशी आहे. चौधरी पूर्वी फळं, आईस्क्रीम आणि ज्युस विक्रीचा व्यवसाय करायचा. हा व्यवसाय सोडल्यानंतर त्याने इलेक्ट्रिशियन म्हणून काम सुरू केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ree

आरोपी चौधरीने ईलेक्ट्रिशियनचं काम करण्याबरोबरच दुसरीकडे सेवाभावी रुग्णालय देखील सुरू केलं होतं. मागील पाच वर्षांपासून तो नारायण मल्टीपर्पज सोसायटी या नावानं हा दवाखाना चालवत होता. दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आरोपीनं कोविड रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने जिल्हा पोलिसांकडे सुरू असलेल्या या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दवाखान्यावर कारवाई करत आरोपीला अटक केली. तसेच पोलिसांनी दवाखान्यातून ऑक्सिजन सिलिंडरसह इतर वैद्यकीय साहित्य जप्त केलं.


 
 
 

Comments


bottom of page