top of page

नागपूर हादरलं ! पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन एकाची आत्महत्या

नागपूर : एका व्यक्तीनं पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली परिसरात घडलीय. या घटनेनं नागपूर पुन्हा एकदा हादरलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. या हत्याकांडामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

ree

आलोक माथुरकर (४८ वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नावं आहे. आलोक हा टेलरिंगचे काम करीत होता. गोळीबार चौकात तो भाड्याच्या खोलीत रहात होता. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पती- पत्नीमध्ये वाद होत होते. या वादाची परिणिती काल रात्री कडाक्याच्या भांडणात झाली होती.

प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पती- पत्नीमध्ये वाद होत होते. या वादाची परिणिती काल रात्री कडाक्याच्या भांडणात झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आलोक रविवारी रात्री जवळच राहणाऱ्या सासू लक्ष्मी यांच्या घरी गेला. तिथे त्याने सासू लक्ष्मी आणि मेहूणी अमिषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवे मारले. त्यानंतर तो रात्री घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने पत्नी, मुलगा व मुलगी या तिघांना ठार मारले. त्यानंतर सकाळच्या सुमारास आलोकने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पहाटेच्यावेळी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुपारी १२च्या दरम्यान या घटनेचे वृत्त आगी सारखे शहरात पसरले त्यानंतर उपराजधानीत या भयानक हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. शेजारच्या लोकांना घरातून आवाज आला नसल्यानं संशय आल्यानंतर त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना सर्वांचे मृतदेह दिसले. शेजाऱ्यांनी या बाबत पोलिसांना सूचना दिली.


 
 
 

Comments


bottom of page