top of page

“माझ्याकडे असे मंत्रालय आहे, जिथे पैशांची कमतरता नाही.....

“माझ्याकडे असे मंत्रालय आहे, जिथे पैशांची कमतरता नाही. राज्ये मागताना थकतील, पण देताना आपण थकणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार बनवा, येत्या पाच वर्षांत मी उत्तर प्रदेशात ५ लाख कोटींची कामे करून दाखवेन. मी त्या नेत्यांपैकी नाही जे पोकळ आश्वासनं देतात. गेल्या वर्षात जे मी बोललो ती सर्व कामे पूर्ण केली असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये १,१२३ कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.


येत्या तीन महिन्यांनंतर टोयोटा, सुझुकी, ह्युंदाई, मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या सर्व गाड्या फ्लेक्स इंजिन बनवतील. फ्लेक्स इंजिन म्हणजे १०० टक्के पेट्रोल टाका किंवा १०० टक्के इथेनॉल टाकून वाहने धावतील. तसेच येत्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशमधील रस्ते युरोपीयन नाही तर अमेरिकेसारखे होतील.- नितीन गडकरी 

 
 
 

Comments


bottom of page