top of page

युट्युब चॅनलमधून नितीन गडकरींना मिळतात महिन्याला ४ लाख रुपये (Video पाहा)

मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओत गडकरी यांनी कोरोनाच्या काळात आपल्या जीवनात कसे बदल झाले, याबद्दल त्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या काळात मी टेकसॅव्ही होण्यासाठी काही पाऊले उचलली. ट्विटरवर माझ्या फॉलोअर्सची संख्याही तब्बल 1 कोटी 20 लाख इतकी असून मी यूट्युब चॅनेलवर सक्रिय झाल्याने आता महिन्याकाठी मला जवळपास 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा खुलासा नितीन गडकरी यांनी केला.


व्हिडिओ पहा 👉 https://youtu.be/sgCWaCgvn6I

ree

कोरोनाच्या काळात माझ्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्या. मला सकाळी आणि संध्याकाळी चालण्याची सवय लागली. या काळात मी भगवदगीताही ऐकायला लागलो. आयुष्यात मला पहिल्यांदाच गीतेचे दहा अध्याय, त्याचे विवेचन शांतपणे ऐकण्याची संधी यानिमित्ताने मला मिळाली. ही माझ्यादृष्टीने खूप मोठी गोष्ट असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.


१९८० च्या दशकात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हेदेखील पराभूत झाले होते. तो काळ आमच्यासाठी प्रचंड निराशेचा होता. अनेकजण या पक्षाला भविष्य नाही, तू चांगला आहे, पण या पक्षात तुझे काही होणार नाही, असे सांगत होते. तेव्हा मीदेखील या गोष्टीवर खूप विचार केला. मात्र, हा पक्ष माझ्या विचारांचा होता. त्यामुळे काहीही झाले तरी हा पक्ष सोडणार नाही, हे मी तेव्हाच ठरवल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page