top of page

New York : सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; १० ठार

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये शनिवारी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बफेलो शहरात घडली असून पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हल्लेखोराने गोळीबाराचा लाईव्ह व्हिडिओ देखील केला.

ree

हेल्मेट घातलेल्या बंदूकधारी व्यक्तीने गजबजलेल्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये चार जणांवर गोळ्या झाडल्या, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. नंतर आत जाऊन गोळीबार केला. स्टोअरमध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे, सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बंदूकधारी व्यक्तीला अटक करण्यात आली. दरम्यान हेल्मेट घातलेल्या बंदूकधारी हा लष्करी वेशभूषेत होता. त्याच्या अंगावर ‘संरक्षण कवच’ही होते. त्याच्याकडे एक कॅमेरा होता ज्याद्वारे ही घटना लाईव्ह स्ट्रीम केली जात होती.



 
 
 

Comments


bottom of page