top of page

Video: …आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातला साष्टांग दंडवत

संसदेच्या नव्या इमारतीचं आज (२८ मे) उद्घाटन आणि लोकार्पण होत आहे. नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवन विधी केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोलची (राजदंड) विधीवत पूजा केली. त्यानंतर सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला वैदिक मंत्रोच्चारात स्थापित केला आहे. तत्पूर्वी मोदींनी या सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. यावेळी आलेल्या संत मंडळींनी वैदिक मंत्रांचा जप केला. या विधींमध्ये पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील सहभागी झाले होते.

सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजदंडाकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड १४ ऑगस्ट १९४७ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सोपवला होता.


 
 
 

Comments


bottom of page