top of page

धक्कादायक! लग्नानंतर ५ दिवसांत पत्नीच्या त्रासाला कंटाळला पती; उचललं टोकाचं पाऊल

लग्न होऊन ५ दिवस झालेल्या एका २३ वर्षाच्या नवविवाहित तरुणानं पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील चुन्सा गावात या गावात घडली. याप्रकरणी मृत व्यक्तीची बहीण सीमा हिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ree

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण प्रयास (वय २३) याचा १४ नोव्हेंबर रोजी कोमल नावाच्या मुलीशी विवाह झाला होता; मात्र लग्नानंतर अवघ्या ५ दिवसांनी त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. 'माझी वहिनी कोमल आणि तिचा भाऊ नितीन कुमार हे दोघं माझ्या भावाचा छळ करत होते. या छळाला कंटाळून प्रयासनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे,' असा आरोप प्रयासची बहिण सीमानं केला आहे,



 
 
 

Comments


bottom of page