top of page

धक्कादायक : आईसमोरच नर्सच्या हातातून नवजात बाळ निसटलं; बाळाचा मृत्यू

नर्सच्या हातातून नवजात बाळ निसटून जमिनीवर पडल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बाळाच्या आईसमोरच लखनऊच्या खासगी रुग्णालयात १९ एप्रिल रोजी ही घटना घडली. मात्र हॉस्पीटल स्टाफने ही घटना लपवण्यासाठी नवजात बाळ मृत जन्मल्याचं कुटूंबियांना सांगितलं होतं. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मात्र नवजात बाळाचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचं समोर आलं.

ree

लखनऊ पोलिसांनी नर्स आणि हॉस्पिटल स्टाफच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तपास अधिकारी अभिषेक पांडे यांनी मृत नवजात बालकाचं पोस्टमार्टम घटनेच्या दिवशीच झाल्याचं सांगितलं. २० एप्रिल रोजी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बाळाच्या मृत्यूचं कारण समोर आलं.अतिरिक्त पोलिस आयुक्त कासीम सिद्दीकी यांनी हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, तसेच २४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केल्याची माहीती दिलीय. मृत बाळाच्या वडील जीवन राजपूत यांनी चिन्हाट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

आपण बाळाला जिवंत पाहिलं असून नर्सने बाळाला टॉवेलमध्ये न गुंडाळता उचललं होतं, तिच्या हातातून बाळ निसटल्याचं बाळाच्या आईने पतीला सांगितलं. या घटनेनंतर रुग्णालयाच्या स्टाफने तिचं तोंड दाबलं आणि धमकावलं असल्याचं तिने सांगितलं.


 
 
 

Comments


bottom of page