top of page

खाजगी बसला भीषण अपघात; काळ आला होता पण…

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन गुजरातकडे जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या अपघातात सुमारे ३० भाविक जखमी असून त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गंभीर जखमींना नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ree

गुजरात मधील ५७ भाविक एका खाजगी बसने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी दर्शन घेऊन गुजरातच्या दिशेने जात असतांना हरसुल येथील घाटात चालकांचा बसवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. रस्त्यावरून बस उलटली आणि मोठा अपघात झाला आहे. सोबत असलेल्या बस देखील लागलीच थांबविण्यात आल्या. इतर बसमधील नागरिकांनी उतरून लागलीच मदत सुरू केली. बसच्या काचा फोडून प्रवाशांना त्यातून बाहेर काढण्यात आले. अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ३० हून अधिक प्रवासी जखमी आहे.


 
 
 

Comments


bottom of page