top of page

नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार

नाशिक शहरातील सिडको भागात सोमवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेले आणि एका पक्षाचे पदाधिकारी असलेले प्रशांत जाधव हे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ree

प्रशांत जाधव हे सोमवारी रात्री घरी जात असतांना उत्तम नगर परिसरातील एका मेडिकल स्टोअरजवळ त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली.

हा गोळीबार नेमका कोणी आणि का केला? याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सी सी टीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे सिडको परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


 
 
 

Comments


bottom of page