top of page

कंटेनर-अर्टिगाचा भीषण अपघात; ३ मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : भरधाव कारने कंटेनरला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. मध्‍यरात्री १ वाजेच्या सुमारास नंदुरबार - निझर रस्‍त्‍यावरील हॉटेल हायवेजवळ हा भीषण अपघात घडला आहे. अपघातात हिरालाल पवार, अनिल सोलंकी आणि प्रशांत सोनवणे हे तिघे मयत झाले असुन यातील प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलात जवान म्हणुन कार्यरत होते. तिन्ही मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

ree

हिरालाल पवार, अनिल सोलंकी आणि प्रशांत सोनवणे हे तिन्ही मित्र सुटीवर आले होते. प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलात जवान होते. ते अर्टीगा कारने मित्रांसोबत पथराई या त्यांच्या गावी जात होते. नंदुरबार-निझर रस्त्यावरील हॉटेल हायवेजवळ पोहोचल्यानंतर अर्टीगा कार आणि कंटेनरची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला.




 
 
 

Comments


bottom of page