top of page

नांदेडमध्ये गुन्हेगाराचा पोलिसांवर तलवारीने हल्ला

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची काही दिवसांपूर्वी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बियाणी यांच्या हत्येनंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांचा वाहनावर दगडफेकही झाली.पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे. तर आरोपीच्या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला.

संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी शहरासह जिल्ह्यातील रेकॉर्ड असणाऱ्या गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला संजुसिंघ बावरी याला पकडण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक वासारणी येथे गेले होते. बावरी हा त्याच्या घरी असताना पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण संजूसिंघ बावरी याने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. यावेळी पोलिस कर्मचारी शिवा पाटील यांच्या खांद्यावर तलवारीचा वार लागला. यामुळे ते जखमी झाले. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक संकेत दिघे हे थोडक्यात बचावले. यावेळी पोलिसांनी जीव धोक्यात असल्याचे पाहून अखेर आरोपी बावरीवर गोळीबार केला. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी गोळी झाडली. या घटनेत जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर शासकीय रुग्णालयात उपचा सुरू आहेत.



 
 
 

Comments


bottom of page