top of page

गँगवॉर ! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पाठलाग... गोळीबार... त्यानंतर तलवारीने वार

नांदेड : गँगवॉरमधून एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास शहरातील गाडीपुरा भागात ही घटना घडली. विक्की ठाकूर असे हत्या करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.

ree

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की ठाकूर याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात ५ गंभीर गुन्हे दाखल असून विक्की ठाकूर काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. रात्री तो आपल्या घराजवळ थांबला असता दोन बाईक्सवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. नेम चुकवून विक्की ठाकूर जीव वाचविण्यासाठी धावत सुटला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर तलवारीने अनेक वार केले, यात विक्की ठाकूर हा जागीच ठार झाला. पुन्हा हवेत गोळीबार करून आरोपी पसार झाले.



 
 
 

Comments


bottom of page