top of page

अन् आरोग्यमंत्र्यांनी 'त्या' विद्यार्थ्याच्या अंत्यसंस्काराला लावली हजेरी

केरळमधील एका तरुणाला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याच्या कुटूंबीयाने अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने सात जणांना नव जीवन मिळाले. नेवीस मॅथ्यू असं ब्रेन डेड झालेल्या तरुणाचं नाव आहे. नवीसचं ह्रदय, हात, डोळे, कि़डनी आणि फुफ्फुस यांचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. केरळचे आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी नेवीसच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली तसंच राज्य सरकारच्या वतीने नेवीसच्या कुटूंबीयाचे आभार मानले.

ree

याबाबत अधिक माहिती अशी, २५ वर्षीय नेवीस मॅथ्यू फ्रान्समधून अकाऊंट्समध्ये मास्टर डिग्री करत होता. कोरोनामुळे तो केरळमधील आपल्या घरातूनच ऑनलाइन क्लासेसद्वारे शिक्षण होता. १८ सप्टेंबरला नेवीस आपल्या नेहमीच्या वेळी उठला नाही म्हणून त्याची छोटी बहीण त्याला उठवण्यासाठी गेली. मात्र नेवीस झोपेतून उठतच नव्हता. यावेळी त्याचा श्वास घेत होता. कुटुंबाने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेलं. नेवीसच्या शरिरातील सारखेचं प्रमाण खूप कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र प्रकृतीत सुधारण होत नसल्याने नेवीसला २० सप्टेंबरला दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. चार दिवसांनी नेवीसला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. यानंतर त्याचे वडील आणि कुटुंबाने अवयवदान करण्याची तयारी दर्शवली. नेवीसचं ह्रदय, हात, डोळे, कि़डनी आणि फुफ्फुस गरजू रुग्णांना देण्यात आलं. केरळचे आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी नेवीसच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली तसंच राज्य सरकारच्या वतीने आभार मानले.


 
 
 

Comments


bottom of page