top of page

धक्कादायक: एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या

एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. नंदेश्वर (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर ) येथे ही घटना घडली असून गावात भितीचे वातावरण पसरले. या प्रकरणी पोेलिसांनी एका ३० वर्षीय तरूणास ताब्यात घेतले असून हत्येचं नेमकं कारण अद्याप असमजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय. दिपाली माळी(वय २१) ,पारूबाई माळी (वय ६०), संगीता माळी(वय ५५) अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत. या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या व दगडांच्या सहाय्याने खून करण्यात आला. तिन्ही महिलांचे मृतदेह घरासमोर अत्यावस्थ पडले होते. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले .

पोलिसांनी समाधान लोहार या संशयित आरोपीस ताब्यात घेतलंय. लोहार आणि माळी हे शेजारी शेजारी आहेत. दोघांमधील बऱ्याच महिन्यांपासून असलेल्या वादांतून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप असमजू शकले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


 
 
 

Comments


bottom of page