top of page

कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; कलम १४४ लागू, शाळा-कॉलेज बंद

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी रात्री बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हर्षा असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. आता या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

ree

रविवारी सायंकाळी नऊच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांने हर्षावर चाकुने वार केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या हर्षाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण याठिकाणी त्याची प्राणज्योत मालवली आहे. हिजाबविरोधी पोस्ट केल्याच्या कारणातून हर्षाची हत्या झाल्याचा आरोप काही संघटनांकडून केला जात आहे. पण ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली? याची कोणीतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आली नाही. हत्येच्या नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहनं जाळली आहेत. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे. लागू करण्यात आली आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना २३ फेब्रुवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


 
 
 

Comments


bottom of page