top of page

१५०० रुपयांसाठी मुलाने केली वडिलांची हत्या

सांभाळून ठेवण्यासाठी दिलेले 1500 रुपये खर्च केल्याच्या रागातून मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात ही घटना घडली. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात थाटीपूर भागातील खलिफा कॉलनीमध्ये बुधवारी हा प्रकार घडला होता. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर थाटीपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाली. थाटीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

आपण वडिलांकडे दीड हजार रुपये सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. काही दिवसांनी आपण त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी ते खर्च झाल्याचं सांगितलं, असं मुलाने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं. पैसे खर्च केल्याने बापलेकात मोठा वाद झाला. रागाच्या भरात मुलाने वडिलांना लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेले वडील कमलेश शर्मा यांना शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



 
 
 

Comments


bottom of page