top of page

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून एका युवकाने धारदार शस्त्राने वार करून एका तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पुसद तालुक्यातील रामपूरनगर (सावरगाव गोरे) येथे आज शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) रा. रामपूरनगर (सावरगाव गोरे) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपीचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला संध्याकाळी धनसळ येथील जंगलातून ताब्यात घेतले.

ree

आरोपी हा अनेक दिवसापासून सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता. दरम्यान आज शनिवारी १५ मे रोजी सुवर्णा चव्हाण हिचे आई, वडील, भाऊ बाहेरगावी लग्नाला गेले होते. या बाबतची माहिती मिळताच गावातच राहणारा आरोपी आकाश हा तरुणीच्या घरात घुसला. यावेळी आकाशने आपल्या जवळील धारदार शस्त्राने तरुणीच्या पोटात सापासप वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला.


दरम्यान,हत्या केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याला धनसळ येथील जंगलातून ताब्यात घेतले. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


 
 
 

Comments


bottom of page