top of page

... रात्री चिकन खाल्लं अन् वडिलांचं डोके धडापासून वेगळं करून देव्हाऱ्यासमोर ठेवलं

आईविरोधात जबाब नोंदवताना मुलाने केला धक्कादायक खुलासा

ree

एका महिलेने आपल्या ५० वर्षीय पतीचे डोके धडापासून वेगळं करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्रिपुरामधील खोवई जिल्ह्यामध्ये शनिवारी (१२ मार्च ) पहाटेच्या सुमारास ही घटना घडलीय. हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र, अंगावर काटा आणणाऱ्या गुन्ह्याबद्दलचा खुलासा आरोपी महिलेच्या मुलाने केला. आईविरोधात जबाब नोंदवताना मुलाने धक्कादायक घटनाक्रम सांगितलाय.

माझी आई ही शाकाहारी असून शुक्रवारी रात्री तिने जेवणात चिकन खाल्लं, असं या मुलाने पोलिसांना सांगितलंय. “जेवणानंतर आम्ही सर्वजण झोपायला गेलो. मात्र रात्री मला अचानक जाग आली तेव्हा माझ्या वडिलांचं डोके हे धडापासून वेगळं करण्यात आल्याचं मला दिसलं. माझी आई हातामध्ये एक धारधार शस्त्र पकडून उभी होती. हे शस्त्र पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं, नंतर आई वडिलांचं कापलेलं डोके हातात पकडून खोलीबाहेर गेली आणि तिने ते डोके देव्हाऱ्यासमोर ठेवलं, असं जबाब नोंदवताना मुलाने सांगितले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं. समोरच्या प्रकार पाहून या मुलाने आरडाओरड केली. त्यानंतर गावकरी जागे झाले. गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावलं.

या महिलेने नंतर स्वत:ला एका खोलीमध्ये कोंडून घेतलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश करत या महिलेला अटक केली. घरामध्ये शीर नसलेला मृतदेह आम्हाला आढळून आला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

मागील काही दिवसांपासून त्याच्या आईची मानसिक परिस्थिती ठीक नसून उपचारासाठी ती एका स्थानिक तांत्रिकाकडे जात असल्याची माहिती मुलाने पोलिसांना दिली.



 
 
 

Comments


bottom of page