top of page

डोक्यात दगड घालून मुलाने केली आईची हत्या

जन्मदात्या आईचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्यातील बार्शी येथे घडला. दरम्यान खून केल्यानंतर मुलगा पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध घेत आहेत, रुक्मिणी नागनाथ फावडे असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

ree

सोमवारी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यावेळी घराच्या कपाऊंडमध्ये एका माहिलेचा मृतदेह झुडपांमध्ये पडलेला दिसला. मृतदेह रुक्मिणी यांचाच असल्याचं त्यांचे पती नागनाथ यांनी नंतर ओळख पटवल्यावर स्पष्ट केलं. मयत रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम हे दोघेजण बार्शी येथील वाणी प्लॉटमध्ये राहत होते. लहान मुलगा व पती यांच्यात नेहमी भांडणं होत असल्याने ते वेगळे राहत होते. मयत रुक्मिणी व श्रीराम यांच्यात पैशावरुन नेहमी वाद होत होते. त्याबाबत पोलीस स्थानकामध्ये तक्रार ही दाखल करण्यात आली होती.

मयत महिलेचे पती नागनाथ फावडे व त्यांचा लहान मुलगा लक्ष्मण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेटस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व कपडे त्याने नेल्याचे लक्षात आल्याने व यापुर्वी ही त्याने आईस व भावास मारहाण केली होती. त्यामुळे मोठ्या मुलानेच आईचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.


 
 
 

Comments


bottom of page