top of page

पुणे हादरलं! पत्नी,मुलाचा खून केल्यानंतर ...

बेरोजगारीमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त

ree

दिवसेंदिवस कोरोनामुळे परिस्थिती बिकट होत चालली असून लॉकडाउनच्या झळा आता सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत. ट्रक चालकाने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेरोजगारीमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात घटना घडली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे (वय 38 वर्षे, रा. वाकवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली) असे गळफास घेणाऱ्या ट्रक चालकाचे नाव आहे. हणुमंत शिंदे हा ट्रक चालक असुन, मागील अडीच वर्षापासुन वाकवस्ती येथे वडील, भाऊ, पत्नी व मुलांसह भाड्याने राहत होता. कोरोनामुळे मागील तीन महिन्यापासून हणुमंत घऱीच होता. दरम्यान ९ मे रोजी सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास तारखेला हनुमंत यांने पत्नी प्रज्ञाचा गळा दाबून खून केला. तर मुलगा शिवतेज (वय - १ वर्ष ) याचा सुरीने गळा कापला. त्यानंतर घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन हनुमंत याने आत्महत्या केली. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? याचाही तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


दरम्यान, हणुमंत शिंदे याचे वडील दऱ्यापा शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हत्येचे नेमके कारण समजले नसले तरी, लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेतुन हनुमंत शिंदे याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 
 
 

Comments


bottom of page