top of page

राजीनामास्त्र ! बीड नंतर अहमदनगर जिल्ह्यातीलही भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

बीड : नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर आपण नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं. तरीही काही तासांतच बीडमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.प्रितम मुंडे यांना डावललं जात असल्याचा आरोप करत राजीनामास्त्र उगारल. जिल्ह्यातील भाजपच्या सर्व ११ तालुकाध्यक्षांसह जवळपास २५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड नंतर आता अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनीही मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे.

ree

बीडचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी "पंकजा मुंडे नाराज नसतील पण खासदार डॉ.प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्यात आली नसल्याने आमची नाराजी कायम आहे", असे सांगत सर्वात अगोदर राजीनामा दिला. त्यांच्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर आणि भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाज माध्यम प्रमुख अमोल वडतीले, तालुकाध्यक्ष महादेव खेडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांच्यासह २५ पदाधिकार्‍यांनी शनिवारी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवले. यामध्ये ११ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.

बीडमधील राजीनाम्याचे सत्र अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहचले असून पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोळुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.


 
 
 

Comments


bottom of page