top of page

Video : कार सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग; अनेक गाड्या जळून खाक

मुंबई : पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत कर्मचारी आत अडकल्याची माहीती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

साई ऑटो या ह्युंडाई सर्व्हिस सेंटरमध्ये सकाळी ११ च्या सुमारास मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. आग इतकी मोठी आहे की परिसरात धुरांचे मोठे लोट पसरले आहेत. परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळं सेंटरच्या बाजूलाच असलेल्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. तसंच, आगीच्या ठिकाणावरुन स्फोटाचे मोठे आवाज येत आहेत. या आगीचा फटका आजूबाजूच्या इमारतींना लागू नये यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे.

या आगीत कोट्यावधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय.



 
 
 

Comments


bottom of page