top of page

रेल्वे स्थानकाजवळ सुटकेसमध्ये आढळला १५ वर्षीय मुलीचा मृतदेह

मुंबईतील नायगाव रेल्वे स्थानकाजवळ बंद सुटकेसमध्ये १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मुलगी गुरुवारी दुपारपासून अंधेरी येथील तिच्या घरातून बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ree

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नायगाव रेल्वे पोलिसांना फोन आला की, नव्याने बांधण्यात आलेल्या पूर्व-पश्चिम पुलाजवळील झुडपात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचल्यावर एका बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. संबधित मुलीच्या पोटावर वार झाल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे तिची हत्या झाली असावी असा अंदाज आहे. घटनास्थळी आढळलेल्या बॅगेत एक टॉवेल आणि काही कपडे तसेच अंधेरीतील एका शाळेचा शाळेचा गणवेश होता.

संबंधित मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत जाते म्हणून अंधेरीतील घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पालकांच्या तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी बेपत्ता मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.


 
 
 

Comments


bottom of page