top of page

Video : आत्महत्येसाठी रेल्वेरुळावर झोपला आणि समोरून ट्रेन आली...

मुंबई : सोशल मीडियाच्या युगात दररोज कुठले ना कुठले व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने " तुमचे जीवन अनमोल आहे, कोणीतरी तुमची घरी वाट पाहत आहे.' अशा कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला असून, तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला १ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून १ हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.

या व्हिडिओत एक व्यक्ती आत्महत्येसाठी रेल्वे रुळावर पडून आहे आणि समोरून भरधाव वेगाने येणारी लोकल ट्रेन येत आहे. रुळावर पडलेला माणूस पाहून मोटरमनने समयसूचकता दाखवत आपत्कालीन ब्रेक लावला आणि काही मीटर अंतरावर ट्रेन थांबवली. यामध्ये त्या व्यक्तीचा जीव वाचला. या व्हिडिओतील घटना शिवडी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तीन आरपीएफ जवान रुळावर पडलेल्या व्यक्तीला रुळावरून बाजुला काढताना दिसत आहेत.


 
 
 

Comments


bottom of page