top of page

उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला; १३ जण जखमी

मुंबई: बांधकाम सुरू असलेल्या एका उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये १३ जण जखमी झाले. मुबंईत पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १३ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. पहाटे अचानक उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्यामुळे १३ मजूर जखमी झाले आहेत. दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी 22 मजूर उपस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.,

Comments


bottom of page