top of page

जाणून घेऊ यात ... "म्युकरमायकोसिस" या जीवघेण्या आजाराबद्दल

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार असून कोरोनाची लागण झाल्यानंतर ज्या रुग्णांना इंजेक्शन टॉसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे, मधुमेह असलेल्या रुग्णांना तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांना या आजाराचा धोका अधिक असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढते. ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा अधिक धोकादायक आहे.

ही बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू पर्यंत पसरली जाते. त्याचे निदान सिटीस्कॅन किंवा इतर चाचणीमध्ये होत नाही. ते एमआरआयमध्येच योग्यरितीने होते. प्रत्येक रुग्णाचे एमआरआय करणे गरजेचे आहे. एमआरआय करण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि ही चाचणी महागही आहे.


लक्षणे :

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे


घ्यावयाची काळजी :

रुग्णांनी लक्षणे दिसताच डोळ्यांचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा तज्ज्ञ यांच्याकडे जावे. वेळीच तपासणी व उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो.


Comentarios


bottom of page