top of page

म्युकरमायकोसिसचा साथरोग कायद्यात समावेश; नवी नियमावली लागू!

देशभरात कोरोनाबाधितांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना "म्युकरमायकोसिस"चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. केंद्र सरकारने "म्युकरमायकोसिस"च्या वाढत्या रुग्णांची दखल घेतली असून या आजाराचा साथरोग कायद्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी राज्याला पत्र पाठवून याची माहिती दिली आहे.

ree

म्युकरमायकोसिसचा समावेश साथरोग कायदा १८९७ अंतर्गत करण्यात यावा. यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये यांनी यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावे. याशिवाय, म्युकरमायकोसिसचे संशयित आणि बाधित अशा रुग्णांची आकडेवारी आरोग्यविभागाला जिल्हानिहाय पुरवली जावी. यामध्ये जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा समावेश असेल”, असं आरोग्यमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.


केंद्र सरकारने राज्य सरकारांना देखील आवाहन केलं असून त्यांनी देखील राज्य पातळीवर म्युकरमायकोसिसला साथीचा आजार म्हणून जाहीर करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तेलंगणा, राजस्थान यासारख्या राज्यांनी आधीच या म्युकरमायकोसिसला साथीचा आजार म्हणून घोषित केलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page