top of page

महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमध्येही आढळले म्युकर मायकोसिसचे रुग्ण

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील आरोग्यसेवेवर ताण पडत असून त्यात भर म्हणून कि काय आता म्युकर मायकोसिसच्या आजारानेही डोके वर काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात म्युकर मायकोसिसमुळे 50 टक्के लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातच म्युकर मायकोसिसचे 2 हजार सक्रिय रुग्ण असून आता ज्या रुग्णालयांसोबत मेडिकल कॉलेजसंलग्न आहे, त्या ठिकाणी म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

ree

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे म्युकर मायकोसिस नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने उपया योजना सुरू केल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्येही म्युकर मायकोसिसचे शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये या आजाराचे 40 रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यात आता या नव्या आजारामुळे सरकारची डोकेदुखी वाढली असून आरोग्य प्रशासनावरही अतिरिक्त ताण पडत आहे.


 
 
 

Comments


bottom of page