top of page

Video पाहा : धोनीच्या नवीन लूक मागील रहस्य काय ?

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्याच्या प्रत्येक बारीक हालचालीवर जगभरातील चाहत्यांचे लक्ष असते. धोनी सतत काही ना काही सोशल मीडियावर शेअर करत असतो. शनिवारी स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून धोनीचा ९ सेकंदाचा तो व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नवीन लूकचा हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला.

ree

या व्हिडिओत त्याच्या डोक्यावर केस नाहीत, त्याने भिक्षूचे कपडे धारण केले आहेत. “क्या है इस अवतार के पिछे का मंत्रा, जल्द ही आपको पता चलेगा” असे बोलून आपल्या चाहत्यांना त्याने आणखी भ्रमात टाकले आहे. त्याच्या नवीन लूकमागील रहस्य काय असेल, याचा अंदाज त्याच्या चाहत्यांनी लावायला सुरूवात देखील केली आहे. प्रत्येकवेळा नवनवीन हेअरस्टाईलला चाहत्यांची वाहवा मिळाली आहे.



 
 
 

Comments


bottom of page