top of page

दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा

राजधानी दिल्लीमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह २१ ठिकाणी सीबीआयने आज सकाळी छापेमारी केली आहे. सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याबद्दल खुद्द सिसोदिया यांनीच ट्विट करत माहिती दिली आहे.

ree

दरम्यान, मनीष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत या कारवाईचा निषेध केला आहे.

“सीबीआयचं आमच्या घरी स्वागत आहे. चौकशी दरम्यानं आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू, जेणे करून सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या आहेत. पण त्यातून काहीही बाहेर आलं नाही. मला पूर्ण विश्वास आहे की या छापेमारीतूनही काहीच साध्य होणार नाही. मी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. अन् त्याला कुणीही रोखू शकत नाही”, असे ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

सिसोदिया यांच्याविरोधातील या कारवाईवर अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीमधील शिक्षण आणि आरोग्य सवेवर होत असलेल्या कामाची दखल जगभरात घेतली जात आहे. या कामाला यांना थांबवायचे आहे. याच कारणामुळे आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. ७५ वर्षातील सर्व चांगल्या कामांना थांबवण्याचे काम करण्यात येत आहे. याच कारणामुळे भारत पिछाडीवर आहे,” अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page