top of page

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC )ची मेगा भरती; तब्बल 8 हजार 169 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSC ने गट-ब आणि गट-क संवर्गातील नोकऱ्यांसाठी तब्बल ८ हजार १६९ जागांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पदवीनंतर अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहतात. त्यासाठी ते MPSC ची तयारी रात्रंदिवस करतात. अशा तरुणांसाठी MPSCने तब्बल ८ हजार १६९ जागांची जाहिरात काढली आहे. गट-ब आणि गट-क संवर्गातील नोकऱ्यांसाठी तब्बल ८ हजार १६९ जागांची भरती निघाली आहे. ही भरती MPSC च्या नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे. गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. यामुळे अभ्यासासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. राज्यातील ३७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. गट-ब सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.



परीक्षेसंदर्भात अर्ज भरणे व इतर माहितीसाठी https://mpsc.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.


 
 
 

Comments


bottom of page