top of page

14 मार्चला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा रविवार, दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.

ree

आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे.


परीक्षेच्या अवघ्या २ दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता उमेदवारांकडून याविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेतील करिअर करु पाहणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी वाट पहावी लागणार आहे.


Comments


bottom of page