top of page

'या' दिवशी थाटात पार पडणार मौनी रॉयचा शाही विवाह सोहळा

टीव्ही ते बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नासाठी गोव्यात हॉटेलही बुक केले आहे. अभिनेत्री मौनी रॉय येत्या २७ जानेवारीला तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत ७ फेरे घेणार आहे. मौनी रॉयचा भावी पती सूरज दुबईत राहतो. तो एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरज मूळचा भारताचा आहे. काही काळापूर्वी मौनी आणि सूरज यांची भेट झाली, त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ree

मौनीचे लग्न दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये २७ जानेवारीला होणार आहे. हा विवाहसोहळा दोन दिवसाचा असेल. लग्नाआधीचे विधी २६ जानेवारीला होतील आणि त्यानंतर २७ जानेवारीला बीच वेडिंग होईल. संपूर्ण स्थळ पांढऱ्या रंगात सजवले जाणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page