top of page

तीन मजली इमारतीला भीषण आग; ५ जणांचा मृत्यू

तीन मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले. ही घटना उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात गुरुवारी रात्री घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक नागरिकांनी मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मजली इमारतीत एकाच कुटुंबातील सदस्य राहत होते. गुरुवारी रात्री या तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. यात पाच जणांना जीव गमवावा लागला असून सात जणांना वाचवण्यात यश आले आगीचे कारण शोधण्यासाठी अग्निशमन विभाग या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.



 
 
 

Comments


bottom of page