top of page

मोदी येणार आहेत... बाल्कनीत कपडे वाळत घालू नका...; पोलिसांचे "ते" पत्र सोशल मीडियावर व्हायरल

सध्या उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या नेत्यांचे या ना त्या कारणाने राज्यात दौरे सुरु आहेत. पुर्वांचल एक्सप्रेसवेच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोदी सोमवारी, (२२ नोव्हेंबर) राजधानी लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी एक पत्र जारी केलेलं आहे. या पत्रात " या भागातील लोकांना १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान खिडकीमध्ये, बाल्कनीत कपडे वाळत घालू नका" असं म्हटलंय. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ree

२२ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमासाठी लखनऊमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या "सरस्वती अपार्टमेंट"च्या अध्यक्षांना गोमतीनगर पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी एक पत्र पाठवलं आहे.

यामध्ये मोदींचा दौरा होईपर्यंत सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर गोमतीनगर सेक्टर चारमधील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाश्यांना १९ नोव्हेंबर २०२१ ते २२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान बाल्कनी किंवा बाल्कनीच्या आजूबाजूला (खिडक्यांमध्ये) कुठेही कोणत्याही प्रकारची कपडे किंवा इतर गोष्टी लटकवू नका, असं म्हटलंय. तसेच या कालावधीमध्ये एखादी नवीन व्यक्ती तुमच्या इमारतीमध्ये वास्तव्यास आल्यास त्यासंदर्भातील माहिती तातडीने पोलीस स्थानकामध्ये कळवावी, असं पोलिसांनी या पत्रात म्हटलंय.


 
 
 

Comments


bottom of page