top of page

सायलेन्सर मॉडिफाय करुन मोठा आवाज करणाऱ्या बाईक्सवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश


अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने मोटरसायकल्सचे सायलेन्सर मॉडिफाय करुन मोठा आवाज करणाऱ्या वाहनांचा आवाज ८० डेसिबलपेक्षा अधिक असल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. न्या अब्दुल मोइन यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिलाय. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिलेत. यासंदर्भात पोलिसांकडून हमीपत्र मागवण्यात आलं असून पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

ree

बाईक्समधील मॉडिफाइड सायलेन्सर्सच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होत आहे तसेच अशाप्रकारे ध्वनी प्रदूषण करणं हे वाहन कायद्यामधील नियमांचे उल्लंघन असल्याचं म्हणत न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केलीय. हा आवाज म्हणजे लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारख्या आहे, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे.

बाईक्सच्या मोठ्या आवाजमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची न्यायालयाने स्वत: दखल घेत उच्च न्यायालयाने हे प्रकरण एका जनहित याचिकेच्या स्वरुपात नोंदवून घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशाची एक प्रत मुख्य सचिव (परिवहन), मुख्य सचिव (गृह), पोलीस महानिर्देशक, उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तसेच वाहतूक विभागाचे डीसीपींना पाठवण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे.

 
 
 

Comments


bottom of page