top of page

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल १२१३ चहाच्या कपांच्या मदतीने साकारले वाळूशिल्प!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस.. . त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिशातील पुरी बीचवर पटनायक यांनी नरेंद्र मोदींचे पाच फूट वाळूचे शिल्प बनवले आहे. मातीच्या चहाच्या कपांचा वापर करुन त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी १ हजार २१३ कपांचा वापर केला आहे.

ree

दरवर्षी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला पटनायक वेगवेगळ्या प्रकारे वाळूची शिल्पे बनवतात. यावर्षी पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर नरेंद्र मोदींचे पाच फूट वाळूचे शिल्प साकारून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. या शिल्पात त्यांनी १ हजार २१३ मातीच्या चहाच्या कपांचा वापर केला आहे. सुदर्शन यांनी जगभरातील ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळू कला स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे.



Comments


bottom of page