top of page

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ट्विटर अकाऊंट हॅक!; त्या ट्विटकडे दुर्लक्ष करा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी मोदी यांचं अकाऊंट काही वेळासाठी हॅक केल्यानंतर हॅकर्सनी बिटकॉईन संदर्भात ट्विट केलं असून भारताने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे असं म्हटलं होतं मात्र. त्यानंतर लगेचच अकाऊंट रिस्टोअर केल्याची माहिती पीएमओकडून देण्यात आली आहे.

ree

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली आहे. “‘पंतप्रधानांचं ट्विटर हँडल @narendramodi सोबत छे़डछाड करण्यात आली होती. ट्विटरला याची माहिती देण्यात आली असून अकाऊंट तात्काळ पुन्हा सुरक्षित करण्यात आलं आहे. छेडछाड करण्यात आलेल्या काळात करण्यात आलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करा,” असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.

अकाऊंट पुन्हा सुरक्षित करण्याआधी पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये बिटकॉईनला मान्यता देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. “भारताने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे. भारताने ५०० बिटकॉईन खरेदी केली असून देशातील लोकांना वाटत आहे,” असं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं होतं.




 
 
 

Comments


bottom of page