top of page

बहिरं सरकार ऐकेल का? मनसेचा सवाल

कोरोनाचं संकट पूर्णपणे टळेपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा विचार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वगळता इतरांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र, असं असतानाही एका तरुणाने लोकलमधून प्रवास केला. परेल स्थानकावर टीसीने त्याला पकडलं. त्यानंतर त्याने व्हिडीओ करून लोकल प्रवासाच्या बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली. तसंच सरकारचंही लक्ष वेधलं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत “बहिरं सरकार ऐकेल का???,” असा सवाल विचारला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे व्हिडिओत ?

एक दीड वर्षांपासून घरी होतो. आता नोकरी मिळाली आहे. आज नोकरीचा दुसराच दिवस आहे. परेल स्थानकावर आल्यानंतर टीसीने मला पकडलं. यात टीसीची काहीच चुकी नाही. ते त्यांचं काम करताहेत. पण, सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणूस रोज कमावतात आणि खातात. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर चारशे रुपये आहेत. खूप मेहनतीनंतर नोकरी मिळाली आहे. तिकीट मिळत नाहीत, पासही मिळत नाहीत. पण सरकारी नोकरदार नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आमच्याकडे आज पैसे नाहीत आणि तरीही आमच्याकडून दंड वसूल केला जात असेल. सरकार अशी लुबाडणूक करत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी काय करायचं? लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. लोक फिरत आहेत मग का कोविड कोविड करत बसायचं?, असं या तरुणाने म्हटलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page