top of page

मराठीमधील सर्वाधिक बजेटच्या चित्रपटाची घोषणा; वाचा सविस्तर ...

आज महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक महेश मांजरेकर महेश मांजरेकर यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. याबाबत महेश मांजरेकरांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या आगामी चित्रपट ‘वीर दौडले सात’चे एक पोस्टर जाहीर केले आहे. यासोबत त्यांनी याला हटके कॅप्शनही दिली आहे. “इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी २०२३”, असे त्यांनी यात म्हटले आहे. विशेष म्हणजे महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे पोस्टर हिंदीतही शेअर केले आहे.



 
 
 

Comments


bottom of page