top of page

ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका...

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा पंकजा मुंडेंना सल्ला

ree

अकोला: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल समर्थकांशी संवाद साधला. यावेळी मनातील खदखद बोलून दाखवतानाच त्यांनी महाराष्ट्र भाजपातील राजकारणावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी "ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका," असा सल्ला पंकजा मुंडे यांना दिला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करत हा सल्ला दिला आहे.

या ट्विटमधून मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.आहे. ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत."नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका., असं मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आता भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देतात , याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page