top of page

सत्ताधारी आमदारानंच दिला “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो” असा नारा....

बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. या मुद्द्यावर विधानपरिषदेमध्ये एकनाथ शिंदे निवेदन देत होते. यावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरील एका आमदारांनी दिलेल्या घोषणेवरून सभागृहात एकच हशा पिकला!

ree

“कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे गांभीर्याने घ्यायला हवं होतं. पण त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी पाहिलं. अशा क्षुल्लक घटना घडतात असं दुर्दैवी वक्तव्य त्यांनी केलं. हे अशोभनीय आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर सत्ताधारी बाकांवरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार करण्यात आला. मात्र, यावेळी सत्ताधारी बाकांवरील एका आमदार महोदयांनी फक्त “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो” एवढंच म्हटलं! पण कुणाला काही कळायच्या आत अजित पवार यांनी संबंधित आमदारांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणा”, असं अजित पवार म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page