top of page

मिताली राजचे आणखी दोन विक्रम

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४ गडी राखुन विजय मिळवला. कर्णधार मिताली राजने या सामन्यात दोन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या विजयासह मिताली राज जगातील सर्वाधिक सामने जिंकणारी महिला कर्णधार ठरली आहे. त्याचबरोबर मितालीने ८६ चेंडूत ७५ धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिले स्थान पटकाविले.

ree

मितालीच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळविला. कर्णधार म्हणून मितालीचा हा ८४ वा विजय ठरला. या विजयासह मिताली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने जिंकणारी कर्णधार ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडीत काढला आहे. बेलिंडाने ८३ एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला होता. या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडची चार्लोटने ७२ सामन्यात विजय मिळवला आहे.

मितालीने ३१७ सामन्यात १०३३७ धावा केल्या असून तिने इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स (१०२७६ धावा) ला मागे टाकले. शार्लोटच्या विक्रम मोडण्यासाठी मितालीला ११ धावांची गरज होती. वेगवान गोलंदाज नॅट सिव्हरला चौकार ठोकत तिने हा टप्पा गाठला. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत शार्लोट ३०९ सामन्यासह १०२७३ धावांसह दुसऱ्या तर न्यूझीलंडची सुझी बेट्स २४७ सामन्यांत ७८४९ धावांसह तिसर्‍या स्थानावर आहे.


 
 
 

Comments


bottom of page